येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमनपदासाठी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदासाठी अर्जुन वाळके यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले. चेअरमनपदासाठी महेंद्र हिंगे, संभाजी गाडे सुचक व अनुमोदक होते. तर व्हाईस चेअरमनपदासाठी बाबासाहेब बोडखे, उमेश गुंजाळ सुचक व अनुमोदक होते.
सर्व संचालकांच्या बहुमताने त्यांची निवड जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी घोषित करुन नुतन चेअरमन शिंदे व व्हाईस चेअरमन वाळके यांचा त्यांनी सत्कार केला. या निवडीनंतर सोसायटी समोर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मुटकुळे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे, संचालक बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, सुरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, विजय पठारे, अतुल कोताडे, बाजीराव अनभुले, शिवाजी लवांडे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, आप्पासाहेब जगताप, ईश्वर धुमाळ, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, सुधीर कानवडे, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ आदी उपस्थित होते.
गणेश पुरी म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे प्रश्न समजून घेऊन टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावावे. अजेंड्याप्रमाणे सभासदांच्या हिताचे कार्य करावे. मागच्या संचालक मंडळाला ज्यामुळे पराभव पत्करावा लागला त्याची पुनरावृत्ती करू नये.
लेखापरीक्षण व्यवस्थित काटेकोरपणे असावे. नवीन संचालक मंडळाने कामात पारदर्शकता निर्माण करावी. तालुका निहाय गरज ओळखून त्याप्रमाणे सभासदांना सेवा द्यावी. शिक्षण, लग्न, वैद्यकीय कर्जासाठी समिती नेमून संचालक मंडळासमोर समितीने योग्य छाननी करून कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्यावी.
महिला सभासदांसाठी विविध योजना राबवाव्या, संस्था वाढीसाठी प्रयत्न करावे व आपला पैसा सुरक्षित असल्याची भावना व विश्वास निर्माण करण्याचा त्यांनी सर्व संचालकांना सल्ला दिला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील नारळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पाडली.
चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभासदाचा विश्वास सार्थ ठरवून पारदर्शक कामकाज केले जाणार आहे. प्रत्येकाशी चांगले वर्तन ठेऊन कोणत्याही प्रकारची दुही ठेवली जाणार नाही. निवडणूक संपली सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाणार असून, सर्व संचालक एकजुटीने सभासद हितासाठी काम करणार आहे.
निवृत्त झाल्यानंतर पुन्हा संचालक म्हणून येणार नसून, मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांनी स्वच्छ व पारदर्शक कारभार आणि सभासद हित हेच ध्येय समोर ठेऊन सर्व संचालक मंडळाचे कार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीसाठी राजेंद्र लांडे, प्रा. सुनील पंडित, नंदकुमार शितोळे, शिरीष टेकाडे, रमजान हवालदार, भीमराज खोसे, सुभाष कडलग, मारुती लांडगे, ज्ञानेश्वर काळे, कल्याण ठोंबरे, बाळासाहेब सोनवणे, दीपक बुधवंत, राजू सोनवणे, माधव काटे, अनिल ठाणगे, राहुल झावरे, सुभाष गव्हाणे, उपस्थित होते.
तसेच यावेळी आत्माराम दहिफळे, सुभाष भागवत, प्राचार्य विजय थोरात, गुलाब गाडेकर, भाऊसाहेब पगारे, गणेश इंगळे, सत्यवान थोरे, सुरेश मिसाळ, सूर्यभान दहिफळे, मिथुन डोंगरे आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे बापूसाहेब तांबे सहकारी मित्र व जळगाव शिक्षक बँकेचे संजय पवार यांनी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचा सत्कार केला.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन संचालक मंडळाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमजान हवालदार यांनी केले. आभार सुभाष कडलग यांनी मानले.