येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - साडेचार ते १० वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांनी 'महाराष्ट्र माझा' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता अभियान, स्त्री जन्माचे व शिक्षणाचे महत्व, याविषयी जनजागृती करत उपस्थितांचे मनोरंजन केले.
निमित्त होते झापवाडी (ता. नेवासा) येथील सर्वोदय पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळ्याचे. यात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मा. श्री. अक्षयदादा कर्डिले साहेब, उद्धवजी मोकाटे, सोमनाथ टिमकरे, भाऊसाहेब खंडागळे, महेश पटारे, रामदास वाघ, उमेश उदावंत, वसीम सय्यद, संदीप डफाळ, सीताराम भांड, पांडुरंग वाघ, विठ्ठल तांबे, उपस्थित होते.
तसेच यावेळी हरिभाऊ येळवंडे, दीपक वाघ, सुधाकर गायवळे, रामकिसन काळे व शाळेचे संस्थापक एकनाथ वाघ यांच्यासह हजारोंच्या संख्यने मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते. एकनाथ वाघ यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
प्रमुख पाहुणे अक्षयदादा कर्डिले यांनी ग्रामीण भागात असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. त्यांच्यासह इतर पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यानंतर सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले. 'माझ्या भिमानं सोन्यानं भरली ओटी', 'एकटी एकटी घाबरलीस ना वाटलच होत आई', या गाण्यांतून कौटुंबिक नात्यांचे महत्व विषद केले. तसेच भारुड व इतर लोककलेचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. याद्वारे सामाजिक जाणिवांबद्दल जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा वैरागर, जॉयशी मॅडम व अर्चना पुंड मॅडम यांनी केले. तर एकनाथ वाघ यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व झापवाडी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.