अहिल्यानगर - शहरातील प्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
टी. एन. हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभात आल्हाट यांना महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी जळगावचे प्रशासन अधिकारी खलिल शेख, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, फारुक शेख, डी.बी. पाटील, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आल्हाट यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. सरोज आल्हाट यांना यापूर्वीही त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार मिळाल्याबद्दल सरोज आल्हाट यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.