अहिल्यानगर - सोनई (ता. नेवासा) येथील सचिन संजय घावटे यांची लोकसेवा आयोगाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सचिनला लहानपणीपासूनच वर्दीचे आकर्षण असल्याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर खेळाडू वृत्तीने त्याला यशापर्यंत नेऊन पोहोचवले.
सचिन हा सोनई येथील प्रगतशील शेतकरी संजय घावटे यांचा मुलगा व दत्तात्रेय घावटे यांचा पुतण्या असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शनिश्वर विद्यामंदिर सोनई या या महाविद्यालयात झाले आहे.
त्याचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोनई या ठिकाणी झाले आहे. विद्यार्थीदशेतच त्याला खेळाचे वेड असल्याने त्याने धनुर्विद्या या खेळात प्रावीण्य मिळवले.
या खेळाचे प्रशिक्षण त्याला आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या (Archery) प्रशिक्षक अभिजीत दळवी सर व डॉ. शुभांगी दळवी मॅडम यांच्याकडून लाभले तसेच त्याला पुढील स्पर्धा परीक्षा करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
अशातच सचिनमधील सुप्त गुणांना ओळखून कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तुवर सर व डॉ. खंदारे सर यांचे पदवी घेत असताना त्याला मार्गदर्शन मिळाले.
सोनई महाविद्यालयात राहिलेले शिक्षण पूर्ण करत असताना त्याने उंच असे शिखर पार करून यशाला गवसणी घातले आहे. त्यामुळे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी दरंदले यांनी केले.