मनोरंजन - मुंबईच्या पु. ल. देशपांडे देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या २१ ते २४ एप्रिल २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ चित्रपताका आयोजित करण्यात आला आहे.
चित्रपताका या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या ४१ चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. २४ एप्रिल दुपारी १ वाजता या महोत्सवात मंगेश महादेव बदर निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला "मदार" हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
या अगोदर 'मदार' या चित्रपटाची महाराष्ट्र शासनाकडून कांस फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली होती. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, अशी एकूण पाच पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विविध फेस्टिवलमध्ये मदार या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील घोटी गावांमधील आहेत.