एनडीए परिक्षेत अहिल्यानगरच्या ईशान परभाणे याला मानाचा तुरा


अहिल्यानगर : नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए-एनए २-२०२४) परिक्षेत अहिल्यानगरच्या ईशान निखिल परभाणे याने उत्तुंग यश संपादन केले आहे. ईशानने या महाकठिण परिक्षेत देशात १४९ व्या स्थानावर आपले नाव सिद्ध केले आहे.

या परिक्षेतून देशात ७९२ विद्यार्थी निवडले गेले आहेत. ईशान हा राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज, देहरादून या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो आरआयएमसीच्या १९७ व्या बॅचचा विद्यार्थी असून जुलै २०२०२ च्या बॅचसाठी त्याची ऑल इंडियामधून चौदाव्या रँकवर निवड झाली होती.

एनडीएची महाकठिण परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता ईशानला चार वर्षांची खडतर ट्रेनिंग पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदावर तो रुजु होईल, अशी माहिती त्याचे वडील निखिल परभाणे यांनी दिली.

दरेवाडी (ता. नगर) येथील कर्नल परब स्कुलमध्ये ईशानने इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कर्नल दिलीप परब व गिता परब यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. डिसेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परिक्षेत ईशानचे देशात चौदावा क्रमांक मिळविला होता.

महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थी निवडले जातात. त्यात ईशानची निवड झाली होती. त्या परिक्षेत ईशानला चारशेपैकी तब्बल ३०५ गुण मिळाले होते. त्यासाठी त्यास कर्नल परब स्कुलचे संचालक कर्नल दिलीप परब यांचे लाभले होते.

या परिक्षेतून देशातील केवळ २५ विद्यार्थी निवडले जातात. त्यात ईशान १४ व्या स्थानी होता. ईशान हा निखिल लाईट हाऊस व सनी इलेक्ट्रीकल्सचे संचालक तथा अहिल्यानगर फटाका व्यापारी असोसिएशने उपाध्यक्ष निखिल परभणे व तृप्ती परभाणे यांचा मुलगा आहे. या निवडीबद्दल ईशान व परभाणे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !