येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - एखादा रूग्ण न्यायालयात अथवा ग्राहकमंचात डॉक्टरांच्या विरोधात गेल्यास तोच केसपेपर त्यांना वाचवू शकतो, केसपेपर व्यवस्थित नसेल तर वकीलही डॉक्टरांना मदत करु शकत नाहीत, असे प्रतिपादन ख्यातनाम फौजदारी वकील सतिशचंद्र व्ही. सुद्रीक यांनी केले.
होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय मनमाड रोड, सावेडी, येथील फौजदारीतील ख्यातनाम वकील सुद्रिक यांना न्याय वैद्यक शास्त्र या विषयावर वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते.
नुकतेच त्यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात ज्येष्ठ विधीज्ञ सुद्रिक यांनी विस्तृतपणे बर्न, स्ट्रॅन्ग्यूलेशन, हॅंगिंग, पॉयझनिंग, थ्रोटलिंग, ड्रॉऊनिंग, ड्रायड्राऊनिंग, प्युट्रिफिकेशन, डिकॉम्पोझिशन, मृत्युचा वेळ, मृत्युपुर्व जबाब नोंदताना डॉक्टरची कर्तव्य इ. विषयांवर कथन केले.
या गोष्टींचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात कायमस्वरूपी उपयोग होईल. रूग्णाचा केस पेपर हा नेहमी काळजीपुर्वक तयार करावा. एखादा रूग्ण न्यायालयात अथवा ग्राहकमंचात डॉक्टरांच्या विरोधात गेल्यास तोच केसपेपर त्यांना वाचवू शकतो, केसपेपर व्यवस्थित नसेल तर वकीलही डॉक्टरांना मदत करू शकत नाहीत.
संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयात कामकाज पाहण्यास पाठविणे, तसेच शवविच्छेदन करतानाचे निरीक्षण करण्यास पाठवणे तसेच नाशिक येथील प्रयोगशाळेतील रासायनिक पृथककरण कसे करतात, याचे निरीक्षणासाठी पाठवतात याबद्दल ज्येष्ठ विधीज्ञ सुद्रिक यांनी समाधान व्यक्त केले.
भविष्यामध्ये परिपुर्ण डॉक्टर कसे होतील याबद्दल होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय ही संस्था घेत असलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक केले. प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल ज्येष्ठ विधीज्ञ सुद्रीक यांचे आभार मानले.