सोनई - येथील 'सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज'मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी 'जेईई मेन' परीक्षेमध्ये अतिशय उत्कृष्ट यश मिळवले आहे. याबद्दल महाविद्यालयातर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
सत्कार समारंभ निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सिद्धार्थ कैलास लांडे (99.76%), तनय तुषार बिबवे (94.15%) व हर्ष कपिल चंगेडिया (88.07%) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या सत्कार समारंभ निमित्त विद्यार्थी व त्यांचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री किरण सोनवणे सर व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ज्योती मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
तसेच या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांवर सध्या सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.