अहिल्यानगर - येथील पाईपलाईन रोडवरील कृष्णानगर येथील महिला मंडळाने सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करून एक वेगळाच संदेश समाजाला दिला.
ज्या काळात महिलांचे बाहेर पडणे मुश्किल होते, त्या काळात सावित्रीबाई फुले घराबाहेर पडून महिलांना शिक्षण देऊ लागल्या. पण यामधे त्यांना बाहेर पाठवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा खुप मोठा वाटा आहे.
कारण त्याकाळी पत्नीला खंबीर साथ देऊन महिलांना शिक्षण देऊन समाजसेवा करणे सोपे नव्हते. आज आपण पाटी पासून ते लॅपटॉप शिकलो, ते फक्त सावित्रीबाईंमुळेच. म्हणून आपण त्यांना कधीही विसरता कामा नये असे, मंडळाच्या अध्यक्षा आशा साठे म्हणाल्या.
यापुढील पिढीने अशा थोर समाजसेवकांना विसरता कामा नये. यासाठी आपला महिलांचा पुढाकार नेहमी पुढे असायला हवा, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी आपल्याला शिकवले पण आपण आपल्या उच्च विचारांने देखील सुसंस्कारित व्हायला हवे.
यावेळी मंडळातील सर्व महिला उपस्थित होत्या. उपाध्याक्षा सिमा परदेशी, कविता नांगरे, जयश्री सवासे, मंगल पांडे, प्रणाली मते, कविता महाजन, पंकजा वाकचौरे, वंदना रणदिवे, प्रतिभा कुर्हे, नांगरे मावशी, आदी महिला उपस्थित होत्या.