येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न संत दासगणू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे शनिवार दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख व्याख्याते म्हणून मदत सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. मोनाश्री आहिरे उपस्थित होत्या.
तसेच प्रथम फौन्डेशनच्या मनिषा शिंदे मॅडम तसेच मदत सोशल फौन्डेशनचे सचिव अतुल बर्वे सर उपस्थित होते. प्रमुख व्याखात्या अॅड. मोनाश्री आहिरे (शिंदे) यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय कुटुंब पद्धत यावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. मनिषा विजय जाधव यांनी देखील महिलांचे काळानुसार होणारे चालीरीती, स्वातंत्र्य, यामध्ये होणारे बदल, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, प्रथम फौन्डेशनच्या मनिषा शिंदे मॅडम यांनी त्याच्या संस्थेत असणाऱ्या रोजगार संधी विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अश्विनी पवार यांनी केले. तर आभार प्राध्यापिका आकांशा जाधव यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, उपस्थित होते.