अहिल्यानगर - नुकताच येथील संगीत गायक, गुरू व अभ्यासक पवन श्रीकांत नाईक यांनी जागतिक संगीत महोत्सव तिसरा दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.
४० व्या फज्र आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव, तेहरान (ईराण) येथे आयोजित केला गेला होता. ७ दिवसीय महोत्सवात पवन श्रीकांत नाईक यांना दोन मैफलींसाठी विशेष निमंत्रित कलाकार म्हणून सहभाग नोंदवला.
पहिली मैफल ईराणी कलाकारांसह तर दुसरी मैफल फक्त भारतीय कलाकार असे हे स्वरूप होते. संपूर्ण जगातील विविध देशांतून ७५ कला समुह यात सहभागी झाले होते.
पवन नाईक मैफलीत भारतीय शास्त्रीय संगीतातील राग बागेश्री, मधूवंती, किरवाणी, दरबारी, व भैरवीत बंदिशी सादर केल्या तसेच अरबी, फारसी, उर्दू, हिंदी व पंजाबी भाषेतील जीवन तत्वज्ञान दर्शक गीते सादर केली.
अवा ए जमीन (Sound Of the Earth) या विशेष (इंडो - पर्शियन) कलावृंदासह हा नाईक यांचा चौथा दौरा होता. भारतातून उदय देशपांडे (तबला) व नेपाळयेथून विवेक सँम्युएल (मोहन विणा) साथसंगत केली.
ईराण मधील 'अवा ए जमीन'चे सर्वेसर्वा वाहिद आईर्यान (गायक, संगीतकार व तंबूर वादक) हे आयोजन विशेष पुढाकार घेतला होता.
सोबत मोज्तबा कलंतरी (सेतार व डफ) तसेच अली शेहबाजी, नासरीन अब्दुलवंद, सरीना अमरोल्लाही, लैला येकानी जा़दे, जाहरा गोजिरी, बेसिक शश्मिनी गीयाजवंद, मोहम्मदरेजा़ अलिजा़दे व अलीजा़दे रुस्तम हे सर्व पर्शियन कलाकार तंबूर साथ व सहगायन साथ दिली.
नाईक यांना शास्त्रीय संगीत व शब्दप्रधान गायकीसाठी गुरू शुभलक्ष्मी गुणे, सुरेश साळवी, मधुसूदन बोपर्डीकर, रेवन्नाथ भनगडे, सतीश आचार्य, कुमुदिनी बोपर्डीकर, शुभांगी मांडे, वीणा कुलकर्णी, रघुनाथ केसकर, डॉ. शुभांगी बहुलीकर व डॉ. विकास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सूफी, उर्दूसाठी मरहूम ख़लिल मुजफ्फर, बशीर अहमद, डॉ. मुहम्मद आज़म व सूफी फैयाज़ अहमद यांचे मार्गदर्शन लाभले. पवन श्रीकांत नाईक यांना या विशेष यशाबद्दल कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने सन्मान व शुभकामना मिळत आहेत.