जागो ग्राहक जागो : नाशिक मधील ‘या’ कार शोरूमला न्यायालयाचा दणका

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक : येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाच्या हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अंबड मधील जितेंद्र मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या थार कारच्या शोरूमला दंडाच्या रकमेसह तक्रारदारस परतावा परत करण्याचे आदेश देत दणका दिला आहे. या प्रकरणी ऍड. उमेश अनपट यांनी तक्रारदार  ग्राहकाची बाजू जिल्हा ग्राहक न्यायालयात मांडली.

तक्रारदार चंद्रकांत बाबुराव घुगे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या महिंद्रा थार कारचा अपघात झाल्याने सदर वाहन जितेंद्र मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या अंबड येथील शोरूममध्ये 14 मे 2023 रोजी दुरुस्तीसाठी दिले. 17 जुलै 2023 रोजी वाहन दुरुस्त करून  खर्च 2, 74,586 रुपये ( दोन लाख श्याहत्तर हजार पाचशे श्याएनशी रुपये) एव्हढा आल्याचे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार यांनी 1,75, 586 /-  ( एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शेह्याशी रुपये) नेट बँकिंग मार्फत आणि उर्वरित 99,000 /- (नव्यानव हजार रुपये ) क्रेडिट कार्ड ने शोरूमच्या स्वप मशीन द्वारे 18 जुलै 2023 रोजी जितेंद्र मोटर्स शोरूमच्या खात्यावर वर्ग केले.

शोरूमची टाळाटाळ : यानंतर काही वेळानंतर श्री. घुगे हे भरलेल्या रकमेची पावती घेण्यासाठी गेले असता लक्षात आले, कि 1,75, 586 /-  ( एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शेह्याशी रुपये) नेट बँकिंग मार्फत आणि उर्वरित 99,000 /- (नव्यानव हजार रुपये ) एवजी 9,90,000 /- (नऊ लाख नव्वद हजार रुपये) असे एकूण 11,65,508 रुपये शोरूमकडे जमा झालेत. शोरूमने गाडी दुरुस्तीची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम श्री. घुगे यांच्या खात्यावर वर्ग करणे गरजेचे होते.

मात्र शोरूम ने 12,317 /- (बार हजार तीनशे सतरा रुपये) एव्हढी रक्कम कमी दिली. श्री. घुगे यांनी सदर रक्कम कमी आल्याबाबत अनेकवेळा फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून रकमेतील तफावत निदर्शनास आणून दिली. मात्र शोरूमणे ही रक्कम देण्यात टाळाटाळ केल्याने आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी श्री. घुगे यांनी नाशिक येथील जिल्हा तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली.

तक्रारदार यांना भरपाई द्या : या अर्जावर कायदेशीर सुनावणी झाल्यानंतर येथील त्रिसदस्यीय न्याय मंचाने तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करून शोरूम चालक यांना आदेशीत करण्यात आले आहे कि, त्यांनी तक्रारदार यांची कपात केलेली रक्कम रुपये 12, 317 /- (बारा हजार तीनशे सतरा रुपये) ही रक्कम 21/7/2023 पासून प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत दर साल दर शेकडा 10 टक्के व्याजाप्रमाणे अदा करावेत.

तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रुपये 10,000 /- (दहा हजार रपये) व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 5,000 /- (पाच हजार रुपये) अदा करावेत.

‘या’ न्यायमंचाने दिला आदेश : नाशिक येथील जिल्हा ग्राहक न्यायालयात अध्यक्षा मंदाकिनी भोसले, सदस्या प्रेरणा महाजन – लोणकर व कविता चव्हाण या त्रिसदस्यीय न्याय मंचासमोर हा खटला चालला.  दोन्ही बाजूनी सादर केलेले पुरावे तपासून व म्हणणे ऐकून या न्याय मंचाने तक्रारदार श्री. घुगे यांचा अर्ज मंजुर करत जितेंद्र मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना सदर आदेशाचे पालन करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

आपली तक्रार ही न्याय मिळविण्यासाठीची शास्वती आपली फसवणूक झाल्यास अगर आपल्यावर अन्याय झाल्यास खचून न जाता त्यासाठी न्यायालयात दाद मागायलाच हवी. आपल्याला स्वतःलाच न्याय मिळविण्याच्या दिशेने टाकलेले हे प्रथम पाऊल आहे. हे पाऊल न उचलल्याने आपल्याला न्याय मिळविण्याचा दरवाजा आपण स्वतःच कायम स्वरूपी बंद करून घेतो. त्यामुळे अन्याय करणाराचे मनोधैर्य वाढून तो दुसऱ्यावर देखील अन्याय करण्यासाठी प्रवृत्त होईल. - चंद्रकांत बाबुराव घुगे, तक्रारदार ग्राहक

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !