बाणेश्वर महाविद्यालयात जागतिक महिला दिनी 'नारी शक्ती'ला सलाम

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागांतर्गत 'स्री कालची आजची व शिक्षण' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सेवानिवृत्त न्यू, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्या नगरच्या प्राणिशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख, अंबिका महिला बँक संचालिका, डॉ. संध्या जाधव यांनी ‘स्री कालची आजची व शिक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम त्यांनी महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करून कौतुक केले. विचारांची देवाण-घेवाण, संस्कृती, स्त्री शक्ती, स्त्री- पुरुष समानता, कर्तृत्ववान स्त्रियांची कामगिरीचा उल्लेख, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.

कालच्या व आजच्या स्त्री मधील आमूलाग्र बदल यावर त्यांनी विशेष भर दिला. सोशल मीडियाचे दुष्परिणाम, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि आजच्या महिला दिनी त्यांनी स्त्री शक्ती कोणत्याही प्रतिकूल  परिस्थितीत माघार घेत नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले.

दुसऱ्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. स्वाती वाघ यांनी आधुनिक शिक्षणाचा फायदा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नसून सर्वच क्षेत्रात स्त्री आज तिचा ठसा उमटवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते मा. श्री. अक्षय दादा कर्डिले यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष म्हणून लाभलेले  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव विजय, आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. राज मोहम्मद शेख, उपस्थित होते.

तसेच यावेळी कला शाखाप्रमुख डॉ. मुळे भाऊसाहेब, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. कर्डिले पुजा, बी.बी. ए. सी. ए. विभाग प्रमुख प्रा. ठाणगे हर्षदा, प्रा. पठाण इप्तीसाम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिवटे धनश्री यांनी केले आणि प्रा. ठाणगे हर्षदा यांनी मानले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !