शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला विद्यार्थी यशस्वी होतो : गणेश ठोकळ


अहिल्यानगर - शिक्षकांच्या शब्दातली ताकद ओळखून त्याचा अंगीकार करावा आणि विद्यार्थी दशेत असताना संगती नेहमी चांगली ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते गणेश ठोकळे यांनी केले. 

श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, भिंगार येथे एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य भाऊसाहेब रोहोकले, प्रमुख वक्ते शिवव्याख्याते गणेश ठोकळ, शिक्षक नेते वैभव सांगळे, विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे , मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षक संपत मुठे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत चांगली तयारी करून प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा संदेश दिला. यावेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली आणि त्यांचे अश्रू अनावर झाले.

शाळेमध्ये घालवलेले अनेक आंबट गोड प्रसंग सांगत विद्यार्थ्यांचे शाळेविषयी असणारं प्रेम भाषणाद्वारे त्यांनी व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषणामध्ये माजी प्राचार्य भाऊसाहेब रोहोकले यांनी परीक्षेला जाताना कशी तयारी करायची यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का बेरड आणि राजश्री भिंगारदिवे या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक संपत मुठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !