27 राज्यातील भाषा, पेहराव व संस्कृती पाहूून भारावले नगरकर

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणात युवान व राष्ट्रीय युवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरात सहभागी झालेल्या युवक-युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून अखंड भारताचे दर्शन घडविले.

विविध प्रांतातून आलेल्या युवकांनी सामाजिक व धार्मिक ऐक्याचा संदेश देऊन विविधतेने नटलेल्या भारतातील विविध संस्कृती व भाषेने लक्ष वेधले. या कार्यक्रमात 27 राज्यातून आलेले 350 युवक-युवतींसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मोने कला मंदिरात एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या सांस्कृतिक कार्यची सुरुवात झाली. सहकार्यवाह गौरव फिरोदिया, संस्थेचे सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, युवानचे कार्यकर्ते रणसिंग परमार, यावेळी उपस्थित होते.

तसेच करयाल सुकुमारन, मधुसूदन दास, नरेंद्र वडगावकर, रजनी इजॉईस, हेमंत लोहगावकर, संदीप कुसळकर, सुरेश मैड, ॲड. श्‍याम असावा आदींसह युवा शिबिराचे सर्व निमंत्रक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात संदीप कुसळकर यांनी देशात जात, धर्म व भाषा वरुन वाद उफाळला असताना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन संपूर्ण देशातील युवक-युवती या सात दिवसीय राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झाले आहेत. यामधील शिबार्थी भाषा, संस्कृती व विचारांची देवाण-घेवाण करत असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली. सर्व घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रादेशिक भाषेतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तर  देश की ताकद नौजवान..., भाईजी की कामना, सद्भावना सद्भावना..., जोडो जोडो भारत जोडे.... या घोषणांनी परिसर दणाणला.

छायाताई फिरोदिया यांनी विविध प्रांतातून आलेल्या युवक युवतींनी राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आंध्रा, आसाम, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, झारखंड आदी राज्यातून आलेल्या युवक-युवतींनी त्यांच्या प्रांतातील भाषा, पेहराव व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमातून शिबिरार्थींनी सर्व धर्माचा आदर, सन्मान करून भारत एक संघ ठेवणे व विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा शिंदे यांनी केले. आभार गीतांजली भावे यांनी मानले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !