ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान लांडगे यांचे निधन

 येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - पिंपळगाव लांडगा (ता. अहिल्यानगर) येथील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी सूर्यभान सावळेराम लांडगे (वय ८४) यांचे मंगळवारी (दि. ४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दै. लोकआवाजचे मालक-संपादक विठ्ठलराव लांडगे, जिल्हा ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग लांडगे यांचे वडील तसेच अहिल्यानगर इलेक्ट्रीकल डिलर्स असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब परभणे यांचे ते सासरे होत.

पिंपळगाव लांडगा आणि परिसरात सूर्यभान लांडगे यांचा समाजिक आणि धार्मिक कामात सहभाग होता. अनेक वर्षे त्यांनी पंढरपूर वारी दर्शन नियोजन सक्रिय सहभाग घेतला. सुरवातीच्या काळात प्रतीकुल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी यशस्वी कुटूंब घडवले.

सूर्यभान लांडगे यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !