अहिल्यानगर - मोकळओहोळ (ता. राहुरी) येथील प्रगतशील शेतकरी सुभाष तुकाराम ढोकणे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री १० वाजता निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. मोकळओहोळ येथील श्री साई ग्रुप उद्योगसमूहाचे संचालक विकास व प्रकाश ढोकणे यांचे ते वडील होते.
प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी शेती केली. ते अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. गावातील पायी दिंडी सोहळा व इतर धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.
नातेवाईक, आप्तेष्ट व मोकळओहोळ परिसरात ते ‘तात्या’ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा दशक्रिया विधी दि. २० फेब्रुवारी रोजी ब्राह्मणी गावातील देवीचे मंदिर येथे होणार आहे. यावेळी धनंजय महाराज ढोकणे यांचे प्रवचन होणार आहे. तर तेराव्याचा विधी दि. २३ फेब्रुवारी रोजी मोकळओहोळ येथे होणार आहे.