येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील शुभांगी तुपे यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्या महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
प्रत्येकात प्रगतीचे शिखर गाठण्याची क्षमता असते. आपण चिकाटीने मनापासून चांगले प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे. त्याला कष्टाची जोड दिल्यास कुठल्याही परीक्षेत यशस्वी होता येतं, अशी प्रतिक्रिया तुपे यांनी व्यक्त केली आहे.
या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आकाश गायकवाड, तुषार वांढेकर, उमाकांत इंगळे, विशाल येवले, शशी विश्वकर्मा, वेदिका जैयवाल, योगिता होनुले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.