नाशिक : पाथर्डीफाटा येथील खंडेरावनगर भागातील सर्व सोसायटी सदस्यांचे खंडेराव मित्र मंडळाच्यावतीने
शिवजयंती उत्सवाचे आयोजन 18 व 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सवाचे आयोजन 18 व 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्या मुलांना म्हणजेच भावी पिढीला द्यावा, या उद्देशातून दोन दिवसात विविध कार्यक्रमांची आखनी करण्यात आली आहे.
मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रम : मंगळवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8:30 ते 11:45 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 ते 12 वयोगट, 12 च्या पुढील ते 18 वयोगट आणि 18 वर्षापुढील सर्व वयोगट अशा तीन गटातील सादरकर्त्यांनी प्रधान्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे, गाणी, भाषण, डान्स आदी विषयांवर आपले सादरीकरण 3 मिनिटात करायचे आहे. तथापि, यात कराओकेवर गाणीसुद्धा म्हणता येतील.
या कार्यक्रमाचे परीक्षण अनुभवी परीक्षकांच्या माध्यमातून करण्यात येईल. तीनही गटातून प्रत्येकी 5 विजेत्यांची निवड केली जाईल. त्यांना प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
बुधवारी महाराजांची प्राण प्रतिष्ठा व आरती : बुधवारी, दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांची प्राण प्रतिष्ठा व आरती होईल. या सोहळ्यास खंडेरावनगर परिसतील सर्व राहिवाशांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन कर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धा, होम मिनिस्टर : दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पहिला गट नर्सरी ते पाचवी आणि दुसरा गट सहावी ते बारावी या दोन गटात होणार आहे. तसेच सायंकाळी 4 ते 6 वाजे दरम्यान महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भव्य मिरवणूक सोहळा : सायंकाळी 6 ते 8 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य मिरवणूक सोहळा मेन रोड ते हरिविश्व सोसायटी व तेथून पुन्हा स्टेजपर्यंत मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
शिव व्याख्यान व पारितोषिक वितरण : रात्री 8 ते 9 या वेळी श्री. छबूजी नागरे साहेब यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित व्याख्यान होईल. यानंतर लगेच या उत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. तसेच सर्व गटामधील सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक आणि प्रत्येक गटातील प्रत्येकी 5 विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
आरती आणि महाप्रसाद : रात्री 9 वाजता आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.