श्रीरामपुरचा कुख्यात सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुलासह जेरबंद


अहिल्यानगर - श्रीरामपूर शहरातील कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे अवैध पिस्तुल सापडले आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहायक पोलिस निरिक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक तयार करून श्रीरामपूर येथील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

दि. ९ फेब्रुवारी रोजी हे पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना सहायक निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शाहरूख रज्जाक शेख (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर) हा फॉर्चुनर गाडी क्र. एम ०४ एफ ४७७१ मधुन बेलापूर येथुन टिळकनगर, श्रीरामपूर येथे गावठी कट्ट्यासह येणार असल्याची माहिती मिळाली.

पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर जाणारे रोडवर कुऱ्हे वस्तीजवळ सापळा लावून थांबले. त्यांना बातमीतील वाहन मिळून आल्याने, वाहनास थांबवून त्यांना तपास पथक व पंचाची ओळख सांगुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरूख शेख असल्याचे सांगितले.

पथकाने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातुन ५४ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल, ४ जिवंत काडतुस, १० लाख रूपये किंमतीची ग्रे रंगाची टोयोटा कंपनीची फॉरच्युनर गाडी एम ०४ एफ ४७७४ व २० हजार रू किं. एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाने ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या गावठी पिस्तुल हे कोठून आणले याबाबत विचारपूस केली. त्याने काहीएक माहिती सांगीतली नाही. त्याने आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने मागील दोन - तीन महिन्यापुर्वी श्रीरामपूर अशोकनगरकडे जाणारे उड्डाणपुलावर एक इसमावर गावठी पिस्तुलातुन फायर केला असल्याची माहिती सांगीतली.

शाहरूख रज्जाक शेख (वय ३२, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याचेविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

आरोपीने श्रीरामपूर येथे फायर करून केलेल्या गुन्हयाच्या सांगीतलेल्या माहितीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील खालीलप्रमाणे एका खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शाहरूख शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे श्रीरामपूर शहर, कोपरगाव, लोणी, कोपरगाव शहर, शिर्डी, नारायणराव (जि. पुणे) दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, यांचे सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !