येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचे प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष पोपटराव कानडे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या आठव्या काव्य संमेलनात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते संतोष कानडे व सुरेखा कानडे यांना सपत्निक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे, कार्याध्यक्ष संगीता (माई) गुंजाळ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, सिने कलाकार मोहनीराज गटणे, काव्य संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे, लीला जंजीरे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग उपस्थित होते.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, संचालक डॉ. भास्कर झावरे, प्रबंधक बबन साबळे, अधिक्षक राजू पाटील, जगन्नाथ सावळे, न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आदींनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.