श्री. बाणेश्वर महाविद्यालयात 'निर्भय कन्या अभियान कार्यशाळेचे उद्‌घाटन


अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यशाळा घेण्यात आली.

दि. ६ फेब्रुवारी रोजी बाणेश्वर महाविद्यालयाचे संचालक युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डीले यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, बाणेश्वर विद्यालयाचे प्राचार्य हापसे, बाणेश्वर बी. एड. कॉलेजचे शिर्के सर, माजी विद्यार्थी आणि तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्‌घाटक म्हणून लाभलेले युवा नेते अक्षयदादा कर्डीले यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना निर्भय कन्या याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट जबीना शेख यांनी स्रीसंरक्षण कायदेविषयक माहिती विद्यार्थिनींना दिली.

तसेच डॉ. मनिषा पुंडे यांनी देखील मुलींना स्वसंरक्षणासाठी काय केले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व सोबत प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वाघ स्वाती यांनी केले व आभार दिवटे धनश्री यांनी मानले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव व्ही. एम., विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी शिंदे ऋषिकेश, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !