श्री बाणेश्वर महाविद्यालयात बहि:शाल व्याख्यानमाला उत्साहात


अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत बहि:शाल शिक्षण मंडळ आणि श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जानेवारी ते 30 जानेवारी यादरम्यान डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रमुख व्याख्याते श्री संभाजी दरोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव व्ही. एम., IQAC कॉर्डिनेटर डॉ. शेख आर. एच व मराठी विभाग प्रमुख डॉ. मुळे बी. एम. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. दिवटे डी. एस. व सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. 

डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यान मालेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून संभाजी दरोडे यांनी “भारतीय लोकशाहीचे युवकांपुढील आव्हाने” या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सूर्यकांत गडकरी यांनी “सकारात्मक विचार शैली आणि प्रभावशाली विचार” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी विचारविनिमय केला. प्रशांत खामकर यांनी “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या विषयावर मार्गदर्शन केले.

दि. 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी यादरम्यान यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी नीलिमा क्षत्रिय, अशोक ढोले व निलेश परबत हे व्याख्याते म्हणून लाभले. या सर्वांनी विविध विषयांवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम राऊत व कार्यक्रमाचे आभार इप्तीसाम पठाण यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव व्ही. एम., सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !