अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून श्री बाणेश्वर शिक्षण संस्था कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे ग्रीन क्लब अंतर्गत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एम. जाधव, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्वाती वाघ, आय. क्यू. ए. सी. कोऑर्डिनेटर डॉ. आर. एच. शेख, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर कोहक, प्रा. राजेश गाडेकर, सर्व विभाग प्रमुख, ग्रीन क्लबचे सदस्य, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
दिंडीमध्ये विद्यार्थ्यानी वृक्ष संवर्धनविषयी जनजागृती करण्यासाठी "झाडे लावा झाडे जगवा" अशा प्रकारच्या घोषणा देऊन संदेश देण्याचे काम केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन त्या झाडांचे संवर्धन करणे व त्यांचे संगोपन करू, असे सर्वांनी आश्वासन दिले. तसेच वृक्ष लागवड करताना झाडांना त्या प्राध्यापक व विद्यार्थी याचे नाव देण्यात आल्यामुळे सर्वांनी ग्रीन क्लबमार्फत त्याची जपण्याची शपथ घेतली.