डिजिटल मीडिया परिषदेची अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कार्याध्यक्षपदी सचिन शिंदे तर सचिवपदी बाबा ढाकणे यांची नियुक्ती

अहिल्यानगर - मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली.

पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगर मधील पत्रकारांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल मिडीया तज्ञ संतोष धायबर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले, अशोक सोनवणे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  

डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पत्रकारांनी देखील डिजिटल मीडियाकडे वळणे काळाची गरज असल्याची भावना डिजिटल मिडीया तज्ञ संतोष धायबर यांनी व्यक्त केली. माध्यम, यु ट्यूब चॅनल व पोर्टल मध्ये पत्रकारिता करणाऱ्या शहरातील युवक एकत्र येत डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून संघटना स्थापन केली आहे.

ही संघटना राज्य पातळीवर काम करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असून, माध्यमांच्या बदलत्या स्वरुपाचा स्विकार करुन वाटचाल करणार आहे. तर नवोदित पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना चालना देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी दिली.  

नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, शरद पवार, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी - कार्याध्यक्ष- सचिन शिंदे, सचिव- बाबा ढाकणे, उपाध्यक्ष- शुभम पाचारणे, सौरभ गायकवाड, खजिनदार सचिन कलमदाने, कार्यकारिणी सदस्य-  गिरीश रासकर, प्रवीण सुरवसे, सचिन मोकळ, प्रसाद शिंदे, अमित आवारी, शब्बीर सय्यद, यतीन कांबळे, मुकुंद भट, दीपक कासवा, अमोल भांबरकर, अनिकेत गवळी, अविनाश बनकर, विक्रम लोखंडे, तुषार चित्तम, प्रकाश साळवे, समर्थ गोसावी, आयनुल शेख.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !