गुड न्युज । कलाकारांनी एकत्र येऊन सुरु केले सिनेलाईफ मिनिप्लेक्स सिनेमागृह

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - नगरकर सिनेरसिकांसाठी अहमदनगर महाविद्यालया शेजारी असलेल्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सिनेलाईफ मिनिप्लेक्स सिनेमागृह सुरु झाले आहे. त्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले.

नगरकरांच्या सेवेत दाखल झालेल्या या सिनेमागृहात तीन स्क्रीन, डॉल्बी ऍटमॉस थिएटर मनोरंजनासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नगरकरांना आपल्या कुटुंबीय आणि मित्र-मैत्रीणीसह वातानुकूलीत अद्यावत सिनेमागृहाचा आनंद घेता येणार आहे.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरीकरण झपाट्याने वाढत असताना मनोरंजनासाठी नागरिकांना सिनेमागृह उपयुक्त ठरणार आहे. तणावपूर्ण जीवनशैली व धकाधिकीच्या जीवनात सिनेमातून मनोरंजन होते. तर काही चांगले सिनेमे जीवनासाठी प्रेरणादायी देखील ठरतात.

मराठी नाटकांची रंगभूमी गाजवलेल्या कलाकारांनी एकत्र येऊन शहरात सिनेमागृहाची मुहूर्तमेढ रोवणे अभिमानास्पद व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शहराचे रूप पालटत असताना, नव्याने झालेल्या सिनेलाईफ मिनिप्लेक्स सिनेमागृहाच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल.

शहरात कुटुंबासह सुरक्षित वातावरणात व दर्जेदार सुविधांसह चित्रपट पाहता यावा यासाठी नगरकर सिनेरसिक वाट पाहत असलेले सिनेलाईफ मिनिप्लेक्स थिएटर सुरु झाले आहे. अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकातील झुडिओ स्टोअर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अद्ययावत सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे.

या सिनेमागृहात तीन स्क्रीन असलेले सुसज्ज सिनेमागृह नगरकरांच्या पसंतीस उतरणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या सिनेमागृहात प्रशस्त पार्किंग, डॉल्बी 7.1 आणि डॉल्बी ऍटमॉस ही साऊंड क्वालिटी असल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

जास्तीत जास्त नगरकरांनी तिकीट बुकींगसाठी 9881300400, 0241-2346000 या नंबरवर अथवा बुकमाय शो या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद, अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष तथा थिएटरचे संचालक अमोल खोले, चित्रपट निर्माते तथा थिएटरचे संचालक स्वप्निल मुनोत आणि स्वरुप मोरे यांनी केले आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कमलेश भंडारी, अभिजीत खोसे, माजी नगरसेवक मनिष साठे, सुर्यकांत खोले, संजय मुनोत, धनश्री खोले, मयुरी मोरे - मुनोत, अक्षय मुनोत, चेतन भंडारी, राकेश भंडारी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !