येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून अवजड वाहन गेल्याने लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक खचले आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनाचा धक्का लागून पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने पुतळ्याशेजारी बॅरीकेट लावण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती.
मात्र त्या पेव्हिंग ब्लॉकच्या रस्त्यावरुन रात्री वाहने जातात. तेथे लावलेले पेव्हिंग ब्लॉक देखील खचले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुतळा परिसराची पहाणी केली होती. जिल्हा प्रशासनाने जिल्हाध्यक्ष योगेश साठे व वंचित बहुजन आघाडीची मागणी लक्षात घेता त्वरित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या शेजारी बॅरिकेट्स लावले आहेत.
त्यामुळे या स्मारकास कुठलीही हानी होणार नाही, याची दक्षता घेतली यासाठी प्रशासनाचे योगेश साठे यांनी आभार मानले.