'युनिक' स्पर्धा : जेंव्हा मुलांसोबत पालक देखील मारतात बाजी, आनंदाची अनुभूती गगनात

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक : येथील युनिक ब्रेन अकॅडमी इंडिया या देशभर घोडदौड करत असलेल्या एज्युकेशनल इन्स्टिटयूटने इंटरनॅशन अबॅकस कॉम्पिटिशन सोबत विविध स्पर्धांचे आयोजन केले. यामध्ये मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही बाजी मारत ट्रॉफी, मेडल्स आणि प्रशस्तिपत्रकांवर आपली नावे कोरली. एकमेकांचा गुणगौरव अनुभवतांना मुलांसह पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता.


इंटरनॅशन अबॅकस कॉम्पिटिशनसोबत आयोजित ड्रॉईंग, युनिक प्रीमिअर लीग क्रिकेट आणि रांगोळ सम्राज्ञी स्पर्धामध्ये मुलांसह पालकनांदेखील मैदानात उतरण्याची संधी युनिक ब्रेन अकॅडमीने प्राप्त करून दिली. या संधीचे सोने करत पालकांनी देखील हिरीरीने मैदान गाजवत अभूतपूर्व विजय मिळविले. तेवढ्याच जबाबदारीने युनिक अकॅडमीने देखील येथील इंदिरानगर मधील सुदर्शन लॉन्स येथे अभूतपूर्व अशा भव्य दिव्य पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करून विद्यार्थी - पालकांचा यथोचित गुणगौरव केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेशराव अनपट, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ श्री. ऍड. मोहसीन सय्यद, सौ. राजलक्ष्मी पिल्ले, शिक्षणतज्ञ सौ. वैशाली पाटील व रोहिणी मोरे आणि सौ. कुसुम अनपट, अण्णासाहेब लवांडे, देवई लवांडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.

युनिक ब्रेन अकॅडमी चे फाऊंडर डायरेक्टर अँड. उमेश अनपट यांनी अकॅडमी ची भविष्यातील वाटचाल विशद करून उपस्थित विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याना शालेय सिलॅबस वर सहजासहजी विजय मिळविण्यासाठी आपला माइंड (ब्रेन) मोठा करणे क्रमप्राप्त आहे. आपल्या माइंडवर ताबा मिळविण्यासाठी युनिक ब्रेन अकॅडमी मधील अँबॅकस चा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स अत्यंत उपयोगी ठरत आहे.


तसेच वेदीक मॅथ कोर्स मधील अनेक अफलातून ट्रिकस बिजगणितातील अवघडातील अवघड आणि अतिशय वेळ खाऊ अलजेबरीक गणितांना चुटकीसरशी  सोडविण्यास अतिशय मदतशीर टुल आहे. तसेच प्री - प्रायमरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्लिश, फॉनिक्स,  मराठी,  हिन्दी या विषयांसोबतच इंग्लिश- मराठी हँडरायटिंगच्या अडचणीना सामोरे जावे लागते. यावर मात करून शिक्षणाचे बेसिक फाउंडेशन मजबूत करण्यासाठी "प्री- प्रायमरी ब्रेन बुस्टर" हा कोर्स खऱ्या अर्थाने रामबाण उपाय ठरेल.   

ज्येष्ठ विधिज्ञ श्री. अँड. मोहसीन सय्यद म्हणाले, की विद्यार्थ्यानी शालेय अभ्यासक्रमाबाहेरील विविध स्किल शिकून स्वतःला भविष्यातील आव्हाणांसाठी तयार करायला हवे. हरण्यातून देखील जिंकण्याची सवय लावणे काळाची गरज आहे. त्यामुळे आयुष्यातील नकारात्मकतेवर सहजपणे मात करता येईल. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मदत होण्यासाठी युनिक अबॅकस आणि ब्रेन अकॅडमी मोलाचे कार्य करीत आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजलक्ष्मी पिल्ले म्हणाल्या, समाजात विविध महिलांवर मोठ्याप्रमाणात अन्याय होताना दिसतात. त्याविरोधात महिलानी रणरागिनी बनून पुढे यायला हवे. तसेच कुटुंबासाठी एक जबाबदार महिला म्हणून भूमिका बजावताना, आर्थिक क्षमता निर्माण करण्यासाठी विविध स्किल आत्मसंद करून पुढे जावे. यासाठी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित पालक महिलांना दिली.

शिक्षणतज्ञ सौ. वैशाली पाटील, युनिक अबॅकस आणि ब्रेन अकॅडमीचे विविध कोर्स विद्यार्थ्याना भेडसावणाऱ्या अनेक शैक्षणीक आव्हाणांसाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरत आहे. नाशिक सह देशात आणि विदेशात युनिक ब्रेन अकॅडमीची सुरू असलेली यशस्वी घोडदौड निक्षितपणे वाखणण्याजोगी आहे. 

शिक्षणतज्ञ सौ. रोहिणी मोरे म्हणाल्या, ग्रेट शास्त्रज्ञ थॉमस एडिसन प्रमाणे आपल्यातील कमरतरतांवर  मात करून आयुष्यात विजयी भरारी घेता यायला हवी. थॉमस एडिसन यांच्या आई प्रमाणेच पालकांमध्येच आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याची क्षमता असते. त्यादृष्टीने त्यांनी खंबीरपणे मुलांच्या मागे उभे राहायला हवे.

इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये एकूण नऊ लेव्हल मध्ये सहभागी देशभरातील विविध राज्यासह नऊ देशातून सहभागी  स्पर्धकांपैकी अनघ प्रशांत बोरसे, रमेश रामलाल गीते, संघर्ष पवन पांडे, भूषण मगन चावला, नैना आर. दास, मिलिंद शशांक देशपांडे, माधुरी रमेश कुलकर्णी, तन्वी हेमंत भडोरिया,  राधेशाम कौस्तुभ वर्मा 

मास्टर किताब , परिणिता केतन शिंदे, नीरव निखिल बोंडे, आरव दिनेश चौधरी, हिमाणी जी. जगताप, मृगनयनी राव, ओमप्रकाश खाबीया, परी मुकेश मित्तल, लीला श्रीधर बक्षी, मयूरी अमित सरनाईक यांनी जिनिअस किताब  आणि हरिओम ज्ञानेश्वर जामकार, सोमय मिथिलेश व्यास, स्वराज शेखर आंभोरे, मयूरेश निमेश गायतोंडे, श्रुती एच. अय्यर, दिया गोपीचंद कुमावत, स्वरूप एम. कांकरिया, लिओ जेम्स फर्नांडिस, पूजा विश्वराज पिल्ले यांनी  एक्सलन्स किताब पटकावला.

निरव निखिल  बोन्डे लकी बायसिकल विजेता : अबॅकसच्या नऊ लेव्हल मधील प्रत्येकी मास्टर किताब, जिनिअस किताब आणि एक्सलन्स किताब पटकवणाऱ्या देश व विदेशातील एकूण 27 विजेत्यांमधून निरव निखिल  बोन्डे या नाशिक मधील एक्सप्रेस इन ब्रँचचा विद्यार्थी लकी बायसीकल विजेता ठरला. 


स्टेट ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये दिव्यांजली गणेश अनपट, जुई नवल दरांगे, अर्णव गाडेकर, श्रेया गोकुळ भागवत, अभिज्ञ शैलेश देशमुख, आयुष मदन हट्टे, नुजरत कासम तांबोळी, निखिल काशीनाथ अभंग, प्रथम, आर्या धनंजय डांगरे, हर्ष संतोष अंतापूरकर, सणीत पंकज केसकर, सईशा सचिन मोर, दक्षित जैसवाल, सेजल उमेश पंडित,  तनिष किरण डिंडे, आयुष संदीप कोकाटे, द्वितीय, व रेयांश वैभव बावीस्कर, हर्षदा अनिल जेजूरकर, नंदिनी दीपक थोरात, सेजळ पंकज मराठे, शिवांश आर. जाधव, आर्या कुलदीप पंडित, मिशका उमेश मानकर, रिया मुकेश नेरपगार, तृतीय तसेच पालकांमधून प्रथम विनोद मुरलीधर पवार , द्वितीय मनीष मुकेश तायडे व तृतीय क्रमांक पूनम केतन शिंदे यांनी मिळत  ट्रॉफीवर नावे कोरली.

युनिक प्रीमिअर लीग क्रिकेट मध्ये वासननगरची बाजी : युनिक प्रीमिअर लीग क्रिकेट अंतर्गत झालेल्या तीन गटातील अंतिम सामन्यांमध्ये तीन पैकी दोन फायनल जिंकून वासननगर ब्रॅच ने सिडको ब्रांच ला पराभूत करून  आपला दबदबा कायम ठेवला. 


यंगर बॉईज फायनल विजेते युनिक लॉयन्स संघातील समर्थ खालकर याने विनर कॅप्टन, यश पांडे याने मॅन ऑफ दी मॅच, पुरुषोत्तम आहेर याने बेस्ट बॅट्समन, विराज गवळी याने बेस्ट बॉलर, रौनक पाटील याने बेस्ट कीपर व अनघ बोरसे याने बेस्ट फिल्डर चषक पटकावला.

युनिक वूमन फायनल विजेत्या रनरागिणी संघातील सौ. आशा उमेश अनपट यांनी बेस्ट कॅप्टन, सौ. छाया वाघ यांनी वूमन ऑफ दी मॅच, सौ. सीमा पटले यांनी बेस्ट बॅट्समन, यशांजली अनपट हिने बेस्ट बॉलर, समृद्धी शिंदे हिने बेस्ट कीपर व किमया बोगिर हिने बेस्ट फिल्डर चषक पटकावला. 

युनिक लिटल चॅम्पस फायनल जिंकणाऱ्या संघातील रायांश गणेश अनपट यांने बेस्ट कॅप्टन , मल्हार भडके  याने मॅन ऑफ दी मॅच, रायांश अनपट याने बेस्ट बॅट्समन, श्लोक भोर याने बेस्ट बॉलर, रोंनीत तळेले याने बेस्ट कीपर व सत्यम गारे याने बेस्ट फिल्डर चषक पटकावला.

राज्यस्तरीय रांगोळी सम्राज्ञी स्पर्धेत राज्यभरातून सहभागी झालेल्या रांगोळी सम्राज्ञीपैकी आम्रपाली वैभव कोठावदे या प्रथम साम्राज्ञी, सरोज सावंत या द्वितीय सम्राज्ञी व साधना दत्तात्रय वावरे या तृतीय सम्राज्ञी चषक विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विविध प्रकार आणि गटांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक चषक, गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉझ मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !