शिवसेना महिला शहर प्रमुखपदी शोभना चव्हाण यांची निवड

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शोभना संजय चव्हाण यांची शिवसेना पक्षाच्या महिला सेना शहर प्रमुखपदी (कार्यक्षेत्र अहिल्यानगर शहर) नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. भाऊसाहेब चौधरी, शिवसेना सचिव, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुबई यांनी पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना शहर प्रमुखपदी (कार्यक्षेत्र अहिल्यानगर शहर) आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास आहे.

शोभना चव्हाण यांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान असून त्या अहिल्यानगर महानगरपालिकामध्ये महिला तक्रार निवारणचे सचिव, अंबिका महिला बँकेचे चेअरमन तसेच भुतकरवाडी येथील शिव मंदिरामध्ये त्या वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करत असतात.

त्यांचा लोकसंपर्क दांडगा असून जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पक्षवाढीसाठी त्या काम करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !