शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख निर्मला धुपधरे यांचे निधन

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - शिवसेनेच्या पहिल्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख निर्मला अरुणकुमार धुपधरे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. काटवन खंडोबा लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अरुणकुमार, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

निर्मला धुपधरे या ‘काकू’ या टोपणनावाने परिचित होत्या. शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात अनेक आंदोलने, मोर्चे, यात त्या हिरीरीने सहभागी होत. त्यातूनच शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांनी त्यांच्याकडे अहमदनगर जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती.

जिल्हा पोलीस दलाच्या शांतता कमिटीच्या त्या सदस्य होत्या. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !