कवयित्री सरोज आल्हाट या मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - येथील सुप्रसिद्ध  कवयित्री सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली आहे.

दि. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुभाषिक कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती सरहद पुणेचे राहुल मेंगडे व देशपाल जवळगे यांनी आल्हाट यांना कळविले आहे.

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे होणार आहे.

स्वागत अध्यक्ष शरद पवार व संमेलन अध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर असणार आहेत. सरोज आल्हाट या वयाच्या दहाव्या वर्षापासून लिखाण करत असून, त्यांचे चार मराठी व एक इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

सरोज आल्हाट यांना अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !