येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक प्रस्तुत देव भक्तीचा भुकेला गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
मराठी अभंग, भक्ती गीत, गवळण, भारुड, प्रताप इत्यादी गीतांच्या बहरदार कार्यक्रमात गायक पवन नाईक यांनी देव भक्तीचा भुकेला या गीतातून श्रोत्यांची मने जिंकली.
अहिल्यानगर शहराला धार्मिक, ऐतिहासिक, नाट्य, कला क्षेत्रातील संस्कृतीचा वारसा लाभलेला असून त्याचे जतन होण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. गीतांच्या माध्यमातून आपल्या परंपरेचा ठेवा अंगीकारला जातो.
संस्काराचे जतन होण्यासाठी अशा धार्मिक गीतांचा कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे वाकळे म्हणाले. आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक यांनी देव भक्तीचा भुकेला गीतातून आपली गौरवशाली परंपरा सादर करत श्रोत्यांची मने जिंकली.
सण, उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्याला लाभलेल्या संस्काराचे जतन होण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत अशा धार्मिक गीतांचा कार्यक्रम संपन्न होणे गरजेचे आहे, असेही वाकळे म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब जाधव, अनिल बोरूडे, शरद देशपांडे, रेवन्नाथ भनगडे, लक्ष्मण डहाळे, अनुजा कुलकर्णी, दिपक शर्मा, प्रसाद सूवर्णपाठकी, ओंकार देऊळगांवकर, सर्वोत्तम क्षीरसागर, पुष्कर कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी कल्याण मुरकुटे, ऋतुजा पाठक, स्मिता राणा, महेश लेले, कुलदीप चव्हाण, शेखर दराडे, मुलाशी परदेशी, राधिका परदेशी, श्रेयस चित्रे, पवन तळेकर, नवरतन वर्मा, संकेत गांधी, डॉक्टर सुनील कात्रे, यांची वाद्य सवाद्य सहगायन साथ संगत लाभली.