राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती


अहिल्यानगर - डाऊच बुद्रुक (ता. कोपरगाव) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडले. दिनांक २ ते ८ जानेवारी दरम्यान या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये बालविवाह प्रतिबंधक जनजागृती केली.

स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या वतीने आयोजित बालविवाह प्रतिबंधक जागृती व्याख्यान दि. ६ जानेवारी रोजी पार पडले. प्रमुख मार्गदर्शक प्रवीण कदम यांनी उपस्थित तरुणाईशी संवाद साधत बालविवाह प्रतिबंधक कायदा, पॉस्को कायदा, बालकांचे अधिकार, भारतातील बालविवाहाचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.

मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, सायबर गुन्हे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले. तसेच, तरुणांनी ध्येय निश्चिती व करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

उपस्थित तरुणांनी बालविवाहास नकार देण्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त योग प्रशिक्षक प्रज्वल ढाकणे यांनी तरुणांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवत तरुणाईमध्ये योगाभ्यासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रोहिदास भडकवाड, डॉ. संजय दवंगे, डॉ. एस.बी. भिंगारदिवे, डॉ. बी. एस. गायकवाड, उपस्थित होते.

तसेच उडान प्रकल्पाचे शाहिद शेख, विकास सुतार, विवेक कर्डिले, आकाश पांडुळे यांच्यासह १०० हून अधिक तरुण-तरुणी उत्साहाने उपस्थित होते. हे व्याख्यान तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत, आरोग्यविषयक व कायदेशीर जागरूकतेसाठी महत्त्वाचे ठरले.

या शिबिराच्या माध्यमातून 'युथ फॉर माय भारत' या संकल्पनेला खऱ्या अर्थाने आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण कदम यांनी सांगितले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !