कुकाणे - कुकाणे न्यू इंग्लिश स्कूल कुकाणे शाळेच्या यशात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे योगदान मोठे आहे. आगामी काळात शाळेची प्रगती टिकवून ठेवण्यात येणार आहे. शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेत बोलवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त हिंमतराव देशमुख यांनी केले.
कुकाणे न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना आमंत्रित केले होते. दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
या मेळाव्याला सेवानिवृत्त शंकर देऊतकर, सुधाकर रसाळ, रघुनाथ पाठक, पुंजाराम सोनवणे, शांतिलाल पंडुरे, भगवान देशमुख, सरला देशमुख, संभाजी देशमुख, दिगंबर घोरपडे, शिरीष देशपांडे, शिवाजी कानडे, अंकुश गरड, जालिंदर सरोदे, रंगनाथ म्हस्के, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
शकूर इनामदार व अमोल बरबडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी प्रा. रामदास गायकवाड यांनी केले. सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन या वेळी विद्यार्थ्यांनी सन्मान केला. प्रदीप भारस्कर, आस्तिक गोर्डे, युन्नूस हमीद शेख, स्मिता बरबडे, अनिसा शेख यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केली.
त्यानंतर सर्व माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी जेवणाचा स्वाद घेतला. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलबिदा नही कहेना या गीताने माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याची सांगता झाली.