येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्व सभासदांची अपघात विमा पॉलिसी काढलेली आहे. या पॉलिसीमुळे अपघातात हाताची पाचही बोटे गमावलेल्या पारनेर पंचायत समितीत कार्यरत सभासद प्रदीप भगवान औटी या सभासदाला मोठा आधार मिळाला आहे.
त्यांना विमा कंपनीने मंजूर केलेल्या ४ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश संस्थेच्या वतीने सभासद औटी यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रदीप औटी यांचा नुकताच अपघात झाला होता. या अपघातात त्यांची हाताची पाचही बोटे निकामी झाली होती. या संदर्भात त्यांना अपघात विम्याचा लाभ मिळावा या साठी संस्थेच्या वतीने विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
यासाठी संस्थेचे संचालक काशिनाथ नरोडे व प्रशांत निमसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर विमा कंपनीने ४ लाख रुपयांची मदत मंजूर केली. तशी माहिती संस्थेला कळविण्यात आली. त्यानुसार संस्थेच्या संचालक मंडळाच्या मासिक मिटिंगमध्ये सभासद प्रदीप औटी यांना संस्थेचे चेअरमन कल्याण मुटकुळे, उपाध्यक्ष मनिषा साळवे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.
प्रदीप औटी यांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाल्याने त्यांनी यावेळी संस्थेच्या विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत संचालक मंडळाला धन्यवाद दिले. ही संस्था खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सभासदांची सर्वतोपरी काळजी घेणारी कामधेनु आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संस्थेचे संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, डॉ.दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, ज्योती पवार, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, सुरेखा महारनूर, प्रशांत निमसे, संभाजी आव्हाड, सभासद अमोल सोनवणे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे उपस्थित होते.