बाप जगासाठी एक माणूस असतो,
पण आपल्यासाठी जग असतो.
बाप गेल्यावरच त्याचं मोल समजतं...
तो आपला आधार असतो.
बाप असला की "जगात माझे कोणी बिघडवू शकत नाही" हा आत्मविश्वास असतो..
बाप बाप असतो.
तो वादळ असतो तर कधी मंद वारा...
ज्यांना आई बाप नाही त्यांना विचारा. बापाचं महत्व काय असतं..?
बाप कधी एकांतात दुःख पचवतो,
क्षणात डोळे पुसत हसत आपल्या पुढें असतों..
तो आपल्यासाठी सारं काही असतो.
बाप सण आला की मुलांना सजवतो
पण स्वतःसाठी काय घ्यावं हा विचारही त्याच्या मनात नसतो,
बाप काळजी घेतो,
बाप सावली असतो
पण त्याचं गहिरेपन
कधी कळलचं नाही कधी..
बाप नसतो तेव्हा,
पाणावलेल्या डोळ्यांनी त्याची आस असते,
आपल्या काळजीने झुरत झुरत खुप लांब निघून गेलेला असतो..
काळजात घर करून
निघून गेलेला असतो बाप आपल्यापासून..
बाप सर्वस्व होता,
कळलंच नाही कधी..
बाप घरातला देव होता
तर कधी समईतील वात.
बाप स्वतःसाठी कधी नाही जगला,
आमच्यासाठी जगला,
बापाच्या आठवणीत जगावं
त्यातच हरवून जावं,
पोरकं होऊन...!
- जयंत येलुलकर (अहिल्यानगर)