अहिल्यानगर - नरेंद्र खरात याने एचडीएफसी. बॅकेतुन वैयक्तीक १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु हे कर्ज त्याने वेळेत भरले नव्हते. म्हणुन त्याचे या कर्जाची रक्कम भरण्यासाठी बॅकेत रक्कम रूपये १५ लाखाचे ई मॅन्डेट बाऊन्स झाले होते.
म्हणुन फिर्यादी बँकेने खरात यांच्याविरूध्द निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट अॅक्ट व पेर्मेन्ट अॅण्ड सेटलमेंन्ट अॅक्ट नुसार खटला दाखल केला होता. या प्रकरणात खरात यांचे वकिल अॅड. सचिन घावटे यांनी बचाव युक्तिवाद केला.
ऍड घावटे म्हणाले की, फिर्यादी बँकेस रक्कम रू. १५ लाख कायदेशीर देणे लागत नाही, हि बाब आरोपीचे वतीने फिर्यादीच्या उलटतपासा दरम्यान व कागदपत्रांच्या आधारे न्यायालयासमोर सिध्द केली.
अॅड. सचिन घावटे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी खरात नरेंद्र राफायल यास निर्दोष मुक्त केले. या खटल्यात अॅड. सचिन घावटे यांना अॅड कृष्णा शेंडगे यांनी सहाय्य केले.