आपण एक वेगळे व्यक्ती आहोत. आणि आयुष्य हे आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळालेली संधी आहे. आयुष्यात दुःख, अडचणी सगळ्यांनाच येतात. त्यातून आपल्याला जर कोणी बाहेर काढणारे असेल तर ते आपणच आहोत. याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे 'स्ट्रेस फ्री, फिल फ्री, अँड चेंज युवर लाईफ' हे पुस्तक आहे.
पहिली पायरी चढल्यावरच दुसरी पायरी येते. एका पायरीवरून आपल्याला लगेच शेवटच्या पायरीवर पोहचता येत नाही. म्हणजेच आपल्याला पहिल्या पायरी पासून सुरुवात करावी लागते. हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ऊर्जास्रोत बनेल, याच आशेतून लिहिलं गेलं आहे.
केवळ देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील लोकांना देखील हे पुस्तक वाचता यावं. विचारांची देवाण-घेवाण व्हावी याचा विचार करून लिहिण्यात आले आहे.
आयुष्यात अनेक चढउतारातून गेल्यावर मला असं समजलं की, ह्या टप्प्यामधून फक्त मी एकटी जात नाही तर, माझ्यासारखे बरेच जण आहेत. आणि माझ्याकडून 'स्ट्रेस फ्री, फिल फ्री, अँड चेंज युवर लाईफ' नावाचं पुस्तकं लिहिलं गेलं.
थोडक्यात, हे पुस्तक आपल्याला जीवनातील ताण तणावातून बाहेर निघण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते. 'ड्रीम बुक पब्लिकेशन, दिल्ली' या नामांकित संस्थेमधून पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
Amezon, Flipkart, Dreambook, Ebook creation on Kindle (worldwide distribution) ऑनलाईन उपलब्ध आहे. वाचक इथून पुस्तक विकत घेऊ शकतात.
लेखिका: शुभांगी माने-कऱ्हाडे