अहिल्यानगर - पेमराज सारडा महाविद्यालयातील छात्रांनी एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या प्रसंगी २४ छात्रांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे ५७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडींग अधिकारी कर्नल राजेश नायर यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी सुबेदार बिपीन कुमार, हवालदार कृष्णा कांबळे, हवालदार नरेद्र सिंग यांनीही रक्तदानात सहभाग घेतला. यावेळी एनसीसीतील क्रांती बोरूडे, कार्तिकी भालेराव, अदिती गायकवाड, माधुरी तिवारी या मुलींनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे धाडस दाखविले.
रक्तदानाबाबत अनेक गैरसमज असल्याने रक्तदानासाठी दाते पुढे येत नाहीत, मात्र एनसीसीच्या छात्रांनी पुढाकार घेऊन त्याबाबत असलेल्या न्यूनगंडावर मात केली, असे करण दुधाडे यावेळी म्हणाला. या रक्तदात्यांपैकी अनेकांनी पहिल्यांदाच रक्तदान केलेले आहे.
विज्ञानाने खूप प्रगती केलेली असली तरी अद्याप प्रयोगशाळेत रक्त तयार केले जात नाही. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही, असे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी म्हटले. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेबाबत त्यांनी त्यांचे कौतुक केले.