आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढत आहे. पण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. त्याचं व्यवस्थापन करणं सहज शक्य आहे. हे सांगणारं पुस्तक नुकतंच वाचनात आले. त्याबद्दल तुम्हाला आज सांगणार आहे.
लेखिका सौ. शुभांगी माने - कऱ्हाडे यांनी नुकत्याच लिहिलेल्या 'स्ट्रेस फ्री, फिल फ्री, अँड चेंज युवर लाईफ' या पुस्तकाबद्दल माझा अभिप्राय तुम्हाला सांगत आहे. 'ताणतणाव व्यवस्थापन' या पुस्तकात अतिशय सहज व सोप्या भाषेत सांगितलेलं आहे.
हे पुस्तक इंग्रजी भाषेमधून लिहिलेलं असलं. तरी यात वापरले गेलेले शब्द वाचकांना खिळवून ठेवतात. या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचताना लेखिका आपल्या लेखणीद्वारे जणू प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत आहेत, असे वाटते.
हरे पुस्तक वाचताना कुठलाही संकुचितपणा वाटत नाही. किंवा शब्दांची ओढाताण करून शब्द जुळवल्याचे वाटत नाही. विशेष म्हणजे या पुस्तकातील प्रत्येक ओळ सकारात्मक विचार देणारी आहे.
स्वतःच्या आयुष्यात आलेले अनुभव व ते अनुभव कसे सकारात्मक आहेत, हे लेखिकेने सांगितले आहे. त्यांनी आपल्या अवतीभवतीच्या जगातून जमवलेले अनुभव आपल्यासाठी ज्ञानाची शिदोरी खुली करावी, असेच हे पुस्तक आहे.
थोडक्यात आयुष्याचं महत्त्व सांगणारे, तणावमुक्त जीवन जगायला लावणारे, सगळ्यांना आपल्या जवळचं वाटावं, असं हे 'स्ट्रेस फ्री, फिल फ्री, अँड चेंज युवर लाईफ' पुस्तक आहे.
'ड्रीम बुक पब्लिशिंग, दिल्ली' या नामांकित संस्थेमधून या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. ते ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, ड्रीमबुक, इबुक क्रिएशन ऑन किंडल (worldwide distribution) ऑनलाईन उपलब्ध आहे. वाचक इथून पुस्तक विकत घेऊ शकतात. तुम्हीही घ्या, आणि सकारात्मक आयुष्य जगायला सुरुवात करा.
- विश्वनाथ नवले (वाचक)