‘दारूच्या बाटल्या रित्या करण्याऐवजी रक्ताच्या पिशव्या भरुया’


अहिल्यानगर - रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन सालाबादाप्रमाणे या वर्षीही जाणीव फाउंडेशन व ज़िल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने 'दारूच्या बाटल्या रित्या करण्याऐवजी रक्ताच्या पिशव्या भरुया' या धर्तीवर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर शंभुराजे चौक, प्रगती डेअरीसमोर, श्रीराम चौकाजवळ, सावेडी, अहमदनगर येथे मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

सन २०२४ या सरत्या वर्षात एक अधिकचे पुण्यकर्म आपल्या खात्यात जमा करण्याची सुवर्णसंधी समजून जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे. रक्तदान हे जीवनदान असते.

विशेष म्हणजे सर्व रक्तदात्यांना आकर्षक जीवनोपयोगी वस्तू भेट दिली जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नेहमीप्रमाणे रक्तदान करुन या पुण्यकर्मात सहभागी होऊन रुग्णसेवा करण्याच्या अनोख्या सन्धीचा लाभ घ्यावा. आम्ही सर्वजण वर्षातून किमान ३ वेळा तरी मोठ्या आनंदाने रक्तदान करतो.

या पुण्यशील उपक्रमासाठी सर्वांनी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनच्या वतीने छायाचित्रकार राहुल जोशी, ॲड. विक्रम वाडेकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, इंजिनीअर बाळासाहेब पवार, यांनी केले आहे.

तसेच विमा सल्लागार राहुल काळे, कर सल्लागार विकास जोशी, सुवर्णकार महेंद्र नांदुरकर, प्रगतीशील शेतकरी शिवशर्मा चेमटे, बांधकाम व्यावसायिक सचिन निक्रड, सन्दिप रोडे, सुभाष बांगर,  दीपक भंडारी, सतिश शिन्दे, विकास गायकवाड, यांनीही शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अतुल इथापे, आशिष वेळापुरे, संजय माने, कैलाश गाडे, गणेश कानवडे, अजय पवार, सतीश इंगळे व इंजिनीअर तथा ॲड. कैलाश दिघे, बांधकाम व्यावसायिक शंतनु पांडव, आदी प्रयत्नशील आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !