खडू-फळ्यात गुंतून न पडता नवतंत्रज्ञानाचा वापर करा


श्रीरामपूर - रयतच्या प्रत्येक शाळेत अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकाने खडू-फळ्यात गुंतून न पडता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, शाळा- महाविद्यालयांना आधुनिकतेकडे नेण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करावा, हीच रयतची नवी ओळख असेल, अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयास नुकतीच रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. यावेळी  मार्गदर्शन सत्रात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले तर सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने व दादाभाऊ कळमकर हे उपस्थित होते.

विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दळवी यांनी सांगितले की, रयतच्या प्रत्येक शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असून आर्थिकदृष्ट्या सक्षम शाखांनी तत्काळ इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करावेत.

तसेच दुर्बल शाखांनी लोकसहभागातून व विभागीय कार्यालयामार्फत निधी उपलब्ध करून घेऊन इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करावेत. आय. एफ. पी. हा तंत्रज्ञानाचा नवा चमत्कार असून असे नवीन तंत्रज्ञान रयतच्या शाळेतील प्रत्येक वर्गात असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दळवी यांनी विभागीय स्तरावरील गुणवत्तेविषयी विशेष समाधान व्यक्त करून विभागीय अधिकारी व गुणवत्ता विकास कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांचे अभिनंदन केले.

तसेच भविष्यातील करिअरच्या संधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी नंतरच्या विविध स्पर्धा परीक्षा तसेच माध्यमिक स्तरावरील स्पर्धा परीक्षांविषयी दळवी यांनी मौलिक मार्गदर्शन करून आढावा घेतला व विभागाच्या गुणवत्तेविषयी कौतुक केले.

सदस्या मीनाताई जगधने व दादाभाऊ कळमकर यांनी विभागीय स्तरावरील कार्यरत भौतिक सुविधा, शेती व बांधकाम विषयक माहिती दिली. तसेच दळवी यांनी सेवकांचे व शाखांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात माहिती घेतली. नवनाथ बोडखे यांनी आभार मानले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !