सहज मनातले ! इतकी वर्षे जाळतोय त्या रावणाला.. पण तो जळलाय का.?

 
काल दसरा झाला. मोबाईल नुसता शुभेच्छांनी भरून गेला. वेगवेगळ्या चित्रांनी, वेगवेगळ्या वाक्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या गेल्या. मनातील रावण मारुन टाका.. अमकं तमकं... हम्म.

गेली हजारो वर्षे आपण रावणदहनाची परंपरा करत आहोत. हल्ली तर त्याला मोठे इव्हेंटचे स्वरूप आले आहे. पूर्वी एका गावात एकच रावणदहनाचा कार्यक्रम होत असे. पण आता प्रत्येक पक्षाचा वेगळा रावण असतो.

पक्षात रावण भरलेले असतातच, पण सर्वांचे रावण दहन वेगवेगळे असते. बरं बाबा इतकी वर्षे जाळतो आपण त्या रावणाला.. पण तो जळलाय कुठे.? अजून तो बालमंदिरातील चिमणीचा घास घेण्यासाठी वखवखलेला आहे.

रस्त्यारस्त्यांवर ॲसिड घेऊन उभा आहे. रात्री बेरात्री तिच्या पदराला हात घालण्यासाठी उभा आहे. हे इव्हेंट करण्यात वेळ, शक्ती, धन वाया घालवण्यापेक्षा मुलांचे लहानपणापासून समतेविषयी समुपदेशन झाले पाहिजे.

स्त्री ही उपभोग्य वस्तू हा विचार नष्ट केला पाहिजे. आजूबाजूला पक्षीय रावणांचे मोठे पोस्टर लावून आपण रावण दहन करतोय. माझे विद्वान पत्रकार सहकारी म्हणाले, 'जिजी, तुम्हाला रावण किती महाज्ञानी, कलाकार, श्रेष्ठ भक्त होता हे माहित आहे ना..?'

मी त्यांना म्हणाले, "हा सर वेदना तो ये नही की रावण महाज्ञानी था.. विटंबना यही है की एक महाज्ञानी रावण था...!!" समजतंय ना.? ही वेदना, ही जखम लवकर भरून यावी. ती अश्वत्थाम्याची होऊ नये म्हणजे झाले.

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !