'त्यांच्या' मरणातून घ्या जगण्याचे धडे !

येथे क्लिक करुन आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

वाचक मित्रांनो नमस्कार !  जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधत आहे. वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा आणि त्याहूनही अधिक चिंतनाचा विषय बनलाय हे मात्र खरे. नैराशातून आत्महत्या करणे याबाबत चिंता करतानाच या मरणातूनही कसे जगण्याचे धडे घेता येतील याचे चिंतन होणे, ही काळाची गरज.


आत्महत्या करून झालेले अनेक दुःखद मृत्यू अलीकडे जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहेत. सर्वसामान्यांसोबतच समाजात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप पाडणारी सेलिब्रेटी मंडळी ज्यावेळी आत्महत्या करतात तेंव्हा हा सामाजिक चिंतनाचा विषय ठरतो. त्यांच्या या कृतीने कुटुंबीय व चाहत्यांना मोठा धक्का बसतो. अशा या अकाली मृत्यंमुळे मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या आणि वाढणारा  प्रचंड दबाव यांचा खोल परिणाम मानवी मनावर होत असलेला दिसून येतो.


डॉ. ज्योत्स्ना मेश्राम
: उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


नूर मलाबिका दास : नूर मलाबिका दास ही भारतीय चित्रपट उद्योगातील एक आश्वासक प्रतिभा होती, जी तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखली जाते. 2024 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी ती आत्महत्या करून मरण पावली.

भैय्यूजी महाराज : स्वतः एक 'अध्यात्मिक गुरू' होते. परंतू त्या आधी ते एक व्यक्ती पण होते. शेवटी त्यांच्यातील व्यक्ती हरला आणि त्यांनी आत्महत्येस कवेत घेतले.



चंद्रकांत : चंद्रकांत, एक सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता, 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी मृतावस्थेत आढळून आला. तेलुगु चित्रपटसृष्टीतील एक लाडकी व्यक्ती होती.


ली स्यू क्युंग : ली स्यू क्युंग, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपट 'पॅरासाइट' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले दक्षिण कोरियाचे अभिनेते, 2020 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी आत्महत्या केली.


अमृता पांडे : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक उगवती तारा अमृता पांडेने 2022 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी आपले जीवन संपवले.


नितीन देसाई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे 2023 मध्ये वयाच्या 57 व्या वर्षी आत्महत्येने निधन झाले. देसाई 'देवदास' आणि 'लगान' सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या असामान्य कामासाठी ओळखले जात होते.


ट्युनिशा शर्मा : ट्युनिशा शर्मा या तरुण आणि प्रतिभावान टेलिव्हिजन अभिनेत्रीने 2022 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी आपले जीवन संपवले. तिचा मृत्यू टेलिव्हिजन उद्योगासाठी एक वेक-अप कॉल होता.


पल्लवी डे : पल्लवी डे, एक लोकप्रिय बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्री, 2022 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्येने मरण पावली.


आसिफ बसरा : आसिफ बसरा, "ब्लॅक फ्रायडे" आणि "काई पो चे" सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे एक अष्टपैलू भारतीय अभिनेते यांनी 2020 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी आपले जीवन संपवले.


सुशांत सिंग राजपूत : पॉझिटिव्ह विचार देणारा 'छिछोरे' सारखा सिनेमा करून देखील एक प्रतिभावान आणि लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 2020 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू हा अलिकडच्या वर्षांत सर्वात उच्च-प्रोफाइल प्रकरणांपैकी एक होता, ज्यामुळे व्यापक मीडिया कव्हरेज आणि सार्वजनिक आक्रोश झाला.

सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनामुळे चित्रपट उद्योगातील मानसिक आरोग्याचा मुद्दा समोर आला, वादविवाद आणि अभिनेत्यांवर येणाऱ्या दबावाबाबत चर्चा सुरू झाल्या.


साने गुरुजी : पायाला घाण लागू नये म्हणून जशी काळजी आपण घेतो तशीच मनाला घाण लावू नये म्हणून काळजी घ्यायला हवी अशी शिकवण आपल्या आईकडून घेणारे आणि असे अनेक सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

अडॉल्फ हिटलर : अवघ जग जिंकणारा, लाखो जीव घेणार्‍या क्रूर  “हिटलरने” शेवटी आत्महत्या केली.


माणुस सर्वसामान्य असू की सेलिब्रेटी वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.

जसे की फुग्यामध्ये हवा भरतच राहिलो तर अंतर्गत दाब वाढत जातो. हा दाब न थांबवल्यास तो फटकन फुटून जातो. माणसेही विचारांचा हल्लकल्लोळ माजल्यावर निर्माण झालेला दबाव सहन न झाल्याने आत्महत्या करतात. त्या वाढत्या दबावाला सम्पवण्यासाठी पर्यायाने स्वतःचा शेवट करून घेतात.

मेंदूत सुरु असलेला हा हल्लकल्लोळ व्यक्त करण्यासाठी आपलंसं वाटणारं कुटुंब, जवळचा मित्र असायलाच हवा. यांच्या सोबत हसा , बोला, रडा, भांडा,  व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा. स्वतःचं जीवन संपवण्यापेक्षा हे केंव्हाही सोपंच नाही का ?

मानसिक आरोग्य दिनाप्रमाणेच आज जागतिक दृष्टी दिन देखील आहे. यानिमित्त आरोग्य स्वास्थ्य जपूया, जीवन आनंदी करूया ! हा 'पॉझिटिव्ह' दृष्टीकोन मनात धरूया.  कारण चांगली दृष्टी असेल तर सुंदर सृष्टी नक्कीच दिसेल.!

- ऍड. उमेश अनपट, समुपदेशक

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !