छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय पक्षाची नोंदणी, 'हे' आहे नाव आणि निवडणूक चिन्ह


कोल्हापूर - दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली 'स्वराज्य संघटना' आता भारतीय निवडणूक आयोगाकडे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना ही माहिती दिली आहे. स्वराज्य संघटना आजपासून 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे, असे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले आहे.

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच होती. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 

जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !