दिवाळीचा सण : नरक चतुर्दशी


प्राग्ज्योतिषपूर हे नरकासुर राजाचे राज्य. (सध्याची गुवाहाटी) भारतीय संस्कृतीत वाराणसी, दिल्ली (हस्तिनापूर) ही प्राचीन शहरं मानली जातात. नरकासुर भूदेवीचा पुत्र म्हणून त्याला भौमिपुत्र असेही म्हणतात.


तो पराक्रमी होता पण अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने मदांध होऊन देव,राजे यांच्या सोळा सहस्त्र कन्यांना बंदीवान केले होते. देवमाता आदितीचे सर्व दागिने चोरुन नेले होते. त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकले.

त्याची माता भूदेवीही या सर्व गोष्टींना विरोध करत होती. श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला. तेव्हा पत्नी सत्यवती हिने श्रीकृष्णाच्या गरुड रथाचे सारथ्य केले होते. सत्यभामा अत्यंत पराक्रमी योध्दा होती.

इथे मला समतेचा पुरस्कार करणारा श्रीकृष्ण दिसतो. नरकासुर वधाचा दिवस होता तो चतुर्दशीला. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाला विनवणी केली, त्याचं स्मरण रहावे.., 'म्हणून या तिथीला मंगलस्नान करणाराला नरकाची पीडा होणार नाही.

आजच्या दिवशी पहाटे तिळाच्या तेलाने मालिश करून आयुर्वेदिक पावडर ने तयार केलेल्या उटण्याने अभ्यंग स्नान करतात, उटणे लावलेल्या अंगाने डाव्या पायाच्या अंगठ्याने किरीट नावाचे कडूफळ फोडून औक्षण तिलक करून मग स्नान करतात.

काही ठिकाणी उपवास करून रात्री भोजन करतात. याला नक्तव्रत म्हणतात. खरंतर वातावरणात थंडी असते, त्यामुळे शरीर कोरडे पडलेले असते. त्यावर तैलमर्दन केल्याने ते मुलायम होते. उटण्याने शरीरावरील मृत त्वचा नाहीशी होते.

नरकासुराचा वध म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश. श्री कृष्ण आणि सत्यभामा यांच्या समतेच्या चळवळ, सोळा सहस्त्र कन्यांच्या पुनर्स्थापित करण्याचा. श्री कृष्णाने त्या सोळा सहस्त्र मुलींना प्रतिष्ठा दिली..नरकासुर वधानंतर श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिषपूर हे राज्य तेथील एक पराक्रमी योध्दा भगदत्त यांच्याकडे सुपूर्द केले.

नरकासुराच्या मातेने.. भूदेवीने आपले सर्व मौल्यवान अलंकार श्रीकृष्णाला अर्पण केले. देवाचे अलंकार परत केले. सण हा एकमेकांना भेटण्यासाठी, आंतरिक जिव्हाळा वाढविण्यासाठी आहे हेच लक्षात ठेवूया.

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !