नतमस्तक ! शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ : सहआयुक्त दत्तात्रय भिसे


अहमदनगर - शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक असतात. शिक्षकांचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ असतात. ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन उजळते, असे प्रतिपादन (वस्तू व सेवा कर) सहआयुक्त दत्तात्रय भिसे यांनी केले. 

भिंगार येथील छावणी परिषदेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेत शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्त प्रा. माणिकराव विधाते, स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, उद्योजक रुपेश भंडारी, उपस्थित होते.

तसेच सेवानिवृत्त अधिकारी अमर गुरप, विष्णू घोलप, स्त्री सखी महिला मंच अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, माजी मुख्या. कारभारी आव्हाड, योगशिक्षक रामचंद्र लोखंडे, अंजना पंडित, मुख्याध्यापक राजू भोसले, शरद पुंड, अंकुश शेळके, रोहित परदेशी, अश्विनी यादव, सोनाली झिरपे उपस्थित होते.

भिसे म्हणाले, आपल्या आई-वडिलांनंतर कोणी गुरु असेल तर ते आपले शिक्षक असतात. आपल्या जीवनातील पंधरा-सोळा वर्ष आपण शिक्षणासाठी खर्च करतो. या वर्षात आपल्या आई-वडिलांव्यतिरिक्त शिक्षकांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते. त्या शिक्षकांचा हा दिवस म्हणजे शिक्षक दिन.

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन रोहित परदेशी यांनी तर आभार मुख्याध्यापक राजू भोसले यांनी मानले.

जीवन सकारात्मकतेकडे नेण्यास मदत : पालकांनंतर, शिक्षक हेच आहेत जे कोणत्याही स्वार्थाशिवाय योग्य मार्ग दाखवून आपले जीवन सकारात्मकतेकडे नेण्यास मदत करतात, असे श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्त प्राध्यापक विधाते सर म्हणाले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !