अहमदनगर - राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त 25 ऑगस्ट रोजी 'आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकस अँड सायन्सेस' या संस्थेकडून 'स्पेस एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले होते.
महर्षी चितांबर विद्या मंदिर येथे झालेल्या या स्पेस एक्स्पोमध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. आर्यभट्ट इंस्टीट्युटचे डायरेक्टर हेमंत केदारे हे इसरो स्पेस ट्यूटर तर आहेतच, शिवाय नासाचे स्पेस अँप लोकल लीड देखील आहेत! त्यामुळे, हे एक्स्पो भरवण्यामागचा त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन विद्यार्थ्यांना फायद्याचा ठरला.
निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, विज्ञान प्रकल्प, अंतराळविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. या एक्स्पोच्या आयोजनात इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
त्यांनी उभारलेल्या कॉस्मिक कॅफेने कार्यक्रमाला चार चांद लावले. पेटपूजा करत सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. भन्नाट कल्पनांनी भरलेले हे एक्स्पो अतिशय सुंदर वैज्ञानिक आविष्कारांचा खजिना ठरले.
अशा अनेक नवविध उपक्रमांचे आयोजन करणारी आर्यभट्ट इन्स्टिट्यूट (AIMS) ही नगर जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. या कार्यक्रमास महर्षी चितांबर विद्या मंदिरच्या प्राचार्य रोकडे मॅडम, आध्यापक प्रशांत कुलकर्णी सर, व एम्सच्या वैष्णवी नागवानी यांचे सहकार्य लाभले व अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.