'एमबीपी लाईव्ह 24' दणका : महापालिकेची 'या' भागात खडीकरणास सुरुवात

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक : पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी शिवारातील रस्त्यांची लागलेली वाट आणि नागरिकांचे होणारे प्रचंड हाल, या बाबतच्या 'MBP Live24' ने  प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या दणक्याने जागे होत आणि या वृत्ताची गंभीर दखल घेऊन नाशिक महानगरपालिकेने या भागात रस्त्यावर खडीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे.


'अनोखं' मॉडेल : पांडवलेणीच्या पायथ्याला घ्या 'चंद्रा'ची अनुभूती, नाशिक महानगरपालिकेचा 'प्रताप' .. या मथळ्याखाली या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे येथील नागरिकांना होणारा त्रास या बाबतचे वृत्त  'MBP Live24' ने 8 ऑगस्ट रिजी प्रसिद्ध केलेले आहे.

नागरिकांच्या व्यथा सदर वृत्तामध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, पथदीप या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नाशिक महानगरपालिका हद्दीतील पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या एकता ग्रीन व्हॅलीच्या पुढील रस्त्याबरोबरच परिसरातील माऊलीनगर, धोंगडेनगर, विजयनगर, स्वप्नपूर्तीनगर मधील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. मोठ मोठ्या खड्यांचे साम्राज्य रस्तांवर पसरलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चंद्रावरील खड्ड्यांसारखी अनुभूतीच येथे मिळतेय, अशी अतिशयोक्तीची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  त्यामुळे हा भाग एखाद्या अतिमागास खेड्यातील आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

मनपा ऍक्शन मोड मध्ये .. :  मात्र, हे वृत्त प्रसिद्ध होताच अवघ्या आठ दिवसांच्या आत ऐकता ग्रीन व्हॅली ते पोतदार स्कुल या मधील रस्त्यावर मंगळवारी, ता. 13 ऑगस्ट रोजी रस्त्याच्या बाजूला खडी चे ढिगारे टाकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आज शुक्रवारी ता. 16 ऑगस्ट रोजी रस्त्यावर प्रत्यक्ष खडी टाकून खडीकरणास सुरुवात केली आहे.

'MBP LIVE 24' चे आभार : या परिसरातील नागरिक गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या गंभीर समस्येमुळे त्रस्त होते. त्यांच्या या हालअपेष्टांची दखल कुणीही घेत नव्हते. मात्र,  'MBP Live24' ने येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन या विषयीचे वृत्त प्रसारीत केले. यामुळे प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरु झाल्याने परिसरातील नागरिक  'MBP Live24' चे आभार व्यक्त करीत आहेत. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !