आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : 'विविधतेतून एकात्मता साधण्याचा संदेश', आपला भारत देश जगाला कसा देतो याचे दर्शन आज येथील पाथर्डीगाव शिवारातील सेंट थॉमस बेथनी स्कुल येथे अनुभवयास मिळाला. 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आज येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
मोठ्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पाथर्डी गाव व शिवारातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिमाखात आपला तिरंगा ध्वज फडकावून 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात.
देशभक्तीचा संचार : यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात प्रामुख्याने देशभक्तीपर गीतांवर आधारित अनेक समूह नृत्यांचा समावेश होता. लहेरा दो.. तिरंगे का परचम लहेरा दो, जय हो,रंग दे बसंती, वंदे मातरम, दुश्मन के छक्के छुडादे हम इंडियावाले, सारे जहांसे अच्छा , ए वतन वतन मेरे आबाद रहो तुम, मा तुझे सलाम, आदी गीतांच्या तालावर सादर केलेले समूह नृत्य, मुलींच्या ढोल ताशाच्या तालावरिल रोमहर्षक लेझीम नृत्य आदी नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश सोनवणे, प्रतिभा महेरिया उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रिंसिपल प्रसादा सिस्टर होत्या. पीटीए सदस्य आशा अनपट, प्रवीण जाधव उपस्थित होते.
आदरभाव जागृती प्रिंसिपल प्रसादा सिस्टर म्हणाल्या, की स्वातंत्र्य दिन आपणास ऐकतेचा संदेश देतो. समाजात एकमेकांप्रती आदर भाव व्यक्त करण्यास सांगतो. देशातील भाषा, वेशभूषा, संस्कृती मधील विविधतेतून देखील एकात्मता राखण्याची प्रेरणा देतो.
स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन : छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, झाशीची राणी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी स्वातंत्र्य सेनानी विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध वेशभूषेच्या माध्यमातून येथे अवतरले. या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करण्यात आले.